Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडक्रांतिवीर नागनाथअण्णा व प्रा.एन.डी.सर हे कायम प्रेरणादायी - काशिनाथ नखाते

क्रांतिवीर नागनाथअण्णा व प्रा.एन.डी.सर हे कायम प्रेरणादायी – काशिनाथ नखाते

डॉ.नागनाथअण्णा नायकवडी व प्रा. एन. डी. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी चिंचवड : भारतीय स्वातंत्र्यानंतर समतेची दुसरी लढाई लढणारे शोषित, पीडित, अन्यायग्रस्त, विस्थापितांचा आधार बनून नागनाथअण्णानीं सहकार चळवळ वाढवली, धरणग्रस्त कोरडवाहू जमिनीच्या पाण्यासाठी लढे केले, साखर कारखाण्यसह शिक्षण संस्था निर्माण केल्या. आणि प्रा.एन.डी.पाटील यांनी जन चळवळ फार मोठ्या प्रमाणात उभी करून परिवर्तन केले. वंचितांच्या मुलांसाठी शिक्षणाचे दारे उभी करून एक मोठा आदर्श निर्माण केला. या दोन्ही महापुरुषाने समतेचा विचार जीवनभर अंगीकारला त्यांचे विचार नेहमी प्रेरक ठरतील असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड येथील कार्यालयामध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी व प्रा.एन.डी. पाटील यांच्या जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रदेश संघटक विजय भोसले, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, ओमप्रकाश मोरया, येळुबाई शिंगे, पवित्रा बनसोडे, सीता सोनवणे, मंगेश पालके, रत्नमाला बनसोडे, सुवर्ण हाणवते, जयश्री लोखंडे, छाया विचारे, निरंजन लोखंडे आदी उपस्थित होते.

नागनाथअण्णा नायकवडी आणि एन‌.डी.पाटील या महान नेत्यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात संस्था उभारणी करून पुरोगामी चळवळ उभी केली. त्यांनी शेतकरी, शेतमजूर तसेच उपेक्षित वर्गाच्या आर्थिक समृद्धी साठी जीवन व्यतीत केले.असे काशिनाथ नखाते म्हणाले. प्रस्तावना तुषार जाधव यांनी केले तर आभार किरण पाटील यांनी मानले.

क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा :

भारतात येणाऱ्या विमानाचे पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग, वाचा काय आहे कारण !

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ‘यांनी’ केली मागणी

मिरा भाईंदर महानगरपालिकेत 44 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची खा.अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा – आमदार अतुल बेनके

केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवत असल्याने ‘ही’ मोठी किंमत मोजावी लागली शरद पवार यांचा आरोप

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय