Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याKolhapur : शाहू महाराजांबद्दल शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

Kolhapur : शाहू महाराजांबद्दल शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

Kolhapur : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संजय मंडलिक यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे. संजय मंडलिक यांनी ‘शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार नाहीत’ असे वादग्रस्त विधान केले आहे, त्यामुळे मंडलिक यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटीवर छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढत आहेत. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. चंदगड तालुक्यातील नेसरी येथील जाहीर सभेमध्ये बोलताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आणि ही कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तसेच, माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? असा सवालही संजय मंडलिक यांनी केला. या विधानावरून आता वाद निर्माण झाला आहे.

मंडलिक यांच्या विधानावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या पायाखालची वाळू खाली घसरत चालली आहे. निवडणूक हातातून जात असल्याचं त्यांना दिसत आहे. म्हणून एक वेगळ्या दिशेला निवडणूक घेऊन जायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण ते यशस्वी होणार नाहीत, असे म्हणत कोल्हापूरकर हे अजिबात सहन करणार नाहीत. शाहूप्रेमी निश्चितच त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतील असे सतेज पाटील म्हणाले.

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी संजय मंडलिक यांच्या विधानावर सावरासावर करत, संजय मंडलिक यांचा हेतू हा छत्रपती घराण्याचा अपमान करण्याचा नक्कीच नसावा, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती वंशाचा पुरावा मागितला होता हे विसरलात का? असेही दरेकर म्हणाले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय