Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाKolhapur : सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

Kolhapur : सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

इचलकरंजी, दि. ३ : उत्तम आरोग्य हीच सर्वात महत्वाची संपत्ती आहे. पतंजली योग समितीच्या माध्यमातून होत असलेले सर्वसामान्यांसाठी योग प्रशिक्षण आणि योग प्रशिक्षक घडवण्याचे वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीचे नाव योगनगरी व आरोग्य नगरी म्हणूनही भविष्यात ओळखले जावे. त्यासाठी इचलकरंजीच्या सर्व योगासन केंद्रांना समाजवादी प्रबोधिनीचे सहकार्य गेली वीस वर्षे आहे व ते पुढेही राहील अशी ग्वाही समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी दिली. Kolhapur

ते समाजवादी प्रबोधिनी आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक महिन्याच्या प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाजवादी प्रबोधिनी येथे गेले एक महिनाभर हा प्रशिक्षण वर्ग सुरू होता. यावेळी चंद्रशेखर (खापणे राज्य प्रभारी महाराष्ट्र पश्चिम), विजय पोवार (जिल्हा प्रभारी ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजय पोवार यांनी प्रास्ताविक केले. तसेच सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरातील सर्व प्रशिक्षणार्थीयांचा निकाल जाहीर केला. यावेळी प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क वर्ग सुरु करण्याकरीता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

प्रशिक्षणार्थीच्या वतीने शिक्षक वर्गास मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचा भेट वस्तु व पुष्प गुच्छ देवुन सन्म्मान करण्यात आला. चंद्रशेख खापणे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. बापूजी पाडळकर (पुणे राज्य प्रभारी) व भारत स्वाभिमान यानी ऑनलाईन येऊन सर्वांना आशिर्वचन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुनिल परीट (जिल्हा संगठन प्रमुख), रविकुमार शर्मा ( जिल्हा सोशल मिडीया प्रभारी) तहसील प्रभारी प्रकाश मोरे, सुनंदा काबरा , सहप्रभारी कृष्णात कांबळे, अजीत चौगुले, विद्याधर पाटील, तसेच सुजाता कोईक, शारदा जासू , शोभाताई पाटील, मनजीभाई पटेल, जगदीश मंत्री ,आंबी , उमाकांत कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश मोरे यांनी सूत्रसंचालन व रविकुमार शर्मा यांनी आभार मानले.

Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 733 पदांसाठी भरती

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय