Junnar / आनंद कांबळे : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या वतीने महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या कला शाखेतील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ व इंडिक्शन प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागप्रमुख प्रा.डॉ. अभिजित पाटील यांनी केले. प्रास्ताविक करत असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय? तसेच परिक्षा संदर्भात माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम याविषयी माहिती, व महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी, जिमखाना व ग्रंथालय इतर विविध विभाग याविषयी माहिती सविस्तर विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करावा यासाठी महाविद्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रम व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले. (Junnar)
कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सतीश जाधव व परिक्षा विभागप्रमुख डॉ. अशोक दुशिंग, एनएसएस विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कोरडे तसेच एनसीसी विभागप्रमुख डॉ. बाबासाहेब माने, डॉ. एकनाथ वाजगे आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Junnar)
तसेच कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध शाखांचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेखा गायकवाड व आभार प्रा. प्रतिक्षा सुकाळे यांनी मानले.
हेही वाचा :
कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात
गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा
बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती
ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी
मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी