जुन्नर (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे इंगळून या ठिकाणी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या उपक्रमांतर्गत स्वच्छतेची मानवी साखळी तयार करण्यात आली तसेच स्वच्छतेची शपथ ग्रामस्थांना देण्यात आली. या प्रसंगी गावच्या सरपंच पुष्पा डामसे उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भारत सरकारच्या “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या उपक्रमांतर्गत हाताविज या ठिकाणी दुर्गा देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.(Junnar)
हाताविज गाव हे पर्यटन गाव म्हणूनही उदयास येत आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी वर्दळ या परिसरात असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा परिसरात जमा होतो. मंदिर परिसरातील निरूपयोगी गवत, झुडपे, प्लास्टिक कचरा, निरूपयोगी वस्तू गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत हाताविज याकडे सुपूर्द करण्यात आला. स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना टोपी वही व पेन तसेच हातमौजे याचे वाटप केले.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा देवी मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान करत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन करण्यासाठी हातविज गावचे सरपंच महादू निर्मळ तसेच गावचे पोलीस पाटील दिपक पारधी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र कोरडे, डॉ. सुप्रिया काळे प्रा विष्णू घोडे प्रा जयश्री कणसे प्रा मयूर चव्हाण यांनी केले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भाग घेत विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जुन्नर(Junnar) तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, यांचे विशेष सहकार्य लाभले.
Junnar
हेही वाचा :
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार
मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार
आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम