Wednesday, November 6, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रातील प्रचाराला वेग! मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार

महाराष्ट्रातील प्रचाराला वेग! मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार

Maharashtra Vidhansabha Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आज, 5 ऑक्टोबर रोजी राज्यात प्रचाराचा धुराळा उडणार आहे. देशातील दोन बडे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. निवडणुका तोंडावर असताना या दौऱ्यांना खूप महत्त्व दिले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिमसह ठाणे आणि नवी मुंबई येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते अनेक उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे. आज सकाळी मोदी वाशिममध्ये येतील. 11.15 च्या सुमारास ते पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 वाजता बंजारा विरासत संग्रहालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल.वाशिममध्ये 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ होईल. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे देखील उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय, 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला जाईल.

याशिवाय, पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 5व्या हप्त्याचेही वितरण करतील.यानंतर ठाणे येथे 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते होईल. सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

दुसरीकडे, काँग्रेस खासदार राहुल गांधी आज कोल्हापूरच्या कसबा-बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. पुतळा अनावरणानंतर राहुल गांधी उपस्थित जनतेला संबोधित करतील.

Maharashtra Vidhansabha Elections

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

संबंधित लेख

लोकप्रिय