गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. कृष्णार येथील २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील २३ वर्षीय आदिवासी तरूण गणेश तेलामी याला क्षयरोग होता. १७ जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २० जुलैला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गणेशचा मृतदेह दुचाकीवरून नेण्यात आला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शासनाच्या माध्यमातून दरवर्षी क्षयरोग निर्मुलनासाठी विशेष मोहीम चालविण्यात येते. रुग्णाच्या नियमित औषधोपचार आणि त्याच्या देखरेखीसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. असे असताना गणेशच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह दुचाकीवर खाट बांधून नेण्याची वेळ आली. या घटनेमुळे गडचिराेलीच्या दुर्गम भागातील आराेग्यसेवेचे धिंडवडे निघाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
हे ही वाचा :
…आता पोलीसही कंत्राटी; तब्बल ‘इतकी’ पदे भरण्याचा निर्णय
धक्कादायक : पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या
गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे
गुजरात मध्ये महापूराचे थैमान, १०२ मृत्यूसह ४११९ जनावरे दगावली
ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, सिनेविश्वात शोककळा
धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले
नोकरीच्या बातम्या वाचा :
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख