Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणनारायणगाव येथे मोफत आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद

नारायणगाव येथे मोफत आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद

नारायणगाव : ससून सर्वोपचार रुग्णालय व नारायणगाव येथील श्री राजे छत्रपती प्रतिष्ठान आयोजित कै. अनिल खैरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २३ रोजी मोफत सर्व रोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे १५० डॉक्टर्स व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर शिबिरास परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. जवळपास १२०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांना औषधोपचार मोफत करण्यात आले. तसेच शिबिराच्या दिवशीच १५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर ६ शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. सदर शिबिरास ससून चे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. व शिबिरातील रुग्णांना पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासित केले. सदर शिबिरात ४० रुग्णांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत नावनोंदणी केली. तसेच जवळपास २० रुग्णांनी अवयव दानाकरिता नावनोंदणी केली. तसेच जवळपास ८० रक्त दात्यांनी रक्तदान देखिल केले.

सदर शिबिरासाठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेश पाटे, पुणे येथील राजू पायगुडे, ससून चे डॉ. साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, परिसरातील सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ यांचे योगदान लाभले.

हे ही वाचा :

संतापजनक : रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवर खाट बांधून नेला मृतदेह

…आता पोलीसही कंत्राटी; तब्बल ‘इतकी’ पदे भरण्याचा निर्णय

धक्कादायक : पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे

गुजरात मध्ये महापूराचे थैमान, १०२ मृत्यूसह ४११९ जनावरे दगावली

ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, सिनेविश्वात शोककळा

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

नोकरीच्या बातम्या वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय