Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याKolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर...

Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी

Kolhapur : कोल्हापूरात भीषण अपघाताची (Kolhapur accident) घटना घडली आहे. कोल्हापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने काँक्रिट मिक्सर मशीन लावत असताना मजुरांना उडविले. या भीषण अपघातात चार जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाठार (ता.हातकणंगले) येथील पुलाजवळ घडला.

कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ हा भीषण अपघात झाला. सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने उडवल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हा भीषण अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

भादोले येथील रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मजुरांची टोळी शिये येथून आपले काम आटोपून टेम्पो (MH 09 CA -9090) मधुन भादोलेकडे निघाले होते. वाठार येथे दुसऱ्या दिवशी काम असल्याने मिक्सर मशीन सोडवून ते लावण्यासाठी सर्वजण खाली उतरले. त्यावेळी कोल्हापूरकडून भरधाव वेगाने (MH 12 LT 7095) आलेल्या ट्रकने सर्व कामगाराना चिरडले. अपघातातील मृत व जखमी सेंट्रींग कामगार भादोले गावचे रहिवासी आहेत. Kolhapur accident

या भीषण अपघातात ४ ठार तर ८ जण गंभीर जखमी झाले. यात दोन महिलांचा समावेश आहे. यामध्ये सचिन धनवडे (वय 40) बाबालाल इमाम मुजावर (वय 50), विकास वड्ड (वय 32),आणि श्रीकेश्वर पासवान (वय 60) असे एकूण 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सुनिल कांबळे, सचिन नलवडे, लक्ष्मण मनोहर राठोड, ऐश्वर्या लक्ष्मण राठोड, सविता लक्ष्मण राठोड, कुमार अवघडे अन्य एक (सर्व रा.भादोले) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

अपघातातील जखमींच्यावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि पेठ वडगाव इथल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Kolhapur accident)

whatsapp link

हे ही वाचा :

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय