Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याBharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज...

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सध्या अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रात पोहोचलेल्या यात्रेची आज (रविवारी) सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगता सभा होणार आहे. यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे इतर नेते सध्या महाराष्ट्रात पोहोचले आहेत. या निमित्तानं या सभेपूर्वी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. या सभेतूनच १८ व्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. आज सकाळी मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान या मार्गावर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून राहुल गांधी यांच्या यात्रेला सुरुवात झाली.

त्यावेळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीदेखील उपस्थित आहेत.

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ६ महिन्यांपासून न झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुहूर्त भेटला आहे.

whatsapp link

हे ही वाचा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

संबंधित लेख

लोकप्रिय