Friday, April 26, 2024
Homeआंबेगावफलोदे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

फलोदे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

घोडेगाव : फलोदे येथे शहिद राजगुरू ग्रंथालय, फलोदे, ललित कलामंदिर व सार्वजनिक विश्वस्त निधी यांच्या वतीने फलोदे व सावरली गावातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नुकताच करण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास पोलिस अंकुश केंगले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच व किसान सभेचे अशोक पेकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व नमूद केले.

या कार्यक्रमासाठी दत्ता गिरंगे, लक्ष्मण मावळे, लिलाबाई मेमाणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जोशी यांनी केले, तर रेखा शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहीद राजगुरू ग्रंथालयाने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय