Solapur : राज्यात तीव्र उष्णतेची लाट सुरु आहे. तापमानाचा दररोज उच्चांक वाढत आहे. अशात रविवारी सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या ठिकाणी तापमानाने 44.3 डिग्री सेल्सिअसचा टप्पा पार केला. (Solapur)
पुणे, पिंपरी चिंचवड शहरात रविवारी तापमानात पुन्हा वाढ दिसून आली या ठिकाणी तापमान 40.3 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते.
सोलापुरात सलग दोन दिवस 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असल्याने एप्रिलमधील उष्णतेची ही दुसरी लाट होती. गेल्या 13 ते 14 दिवसापासून सोलापूरचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत राज्यातील तापमान सरासरी 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या झळा बसत आहेत. रात्रीचे तापमान थोडे घसरले तरी काही भागात उकाडा राहणार आहे. बुलढाणा, यवतमाळ,वर्धा, चंद्रपूर, अमरावती सह राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, तेलंगणा, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, केरळ या राज्यातील तापमान 42 डीग्री सेल्सिअसच्या पुढेच आहे.
या वर्षी तापमानवाढीचा उच्चांक संपूर्ण देशभर आहे, नागरिक त्यामुळे हैराण झाले आहे
हे ही वाचा :
भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका
अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे
ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई
मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट
ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन
धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना