मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दलितांवर अत्याचार केल्याची एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका व्यक्तीने ३ दलित मुलांना मारहाण केल्याचे दिसत आहे.विहिरीचे पाणी प्यायल्याने त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मारहाण करत असल्याने लहान मुलं जोरजोरात ओरडत आहे.
X वर कॉंग्रेस अध्यक्ष जीती पटवारी यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी पोस्टवर लिहले आहे की, ४ दिवसांपूर्वी ही घटना जबलपूर मध्ये घडली. पोस्टवर त्यांनी सरकारला याबाबत प्रश्न विचारला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्संनी प्रतिक्रिया करत संताप व्यक्त केला आहे.