Food poisoning : कर्नाटकातील यशवंतपूर येथून येणारी ट्रेन गोरखपूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर जेव्हा आली तेव्हा गोरखपूर रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. रेल्वे प्रशासन, सुरक्षा दल आणि डॉक्टरांचे पथकही घाईघाईत तेथे पोहोचले. त्याचं झालं असं की, ट्रेनमधील काही प्रवाशांनी बिर्याणी आणि अंडा करी खाल्ली होती. त्यामुळे सुमारे 50 प्रवाशांची तब्येत बिघडली.(Food poisoning)
यशवंतपूर-गोरखपूर सुपरफास्ट ट्रेनमध्ये ही घटना घडली. या रेल्वेतील प्रवाशांनी धावणाऱ्या विक्रेत्यांकडून बिर्याणी आणि अंडी करी विकत घेऊन खाल्ली होती. या प्रवाशांनी हे पदार्थ रेल्वेतच घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळनंतर झांशी आणि कानपूर सेंट्रलमध्ये पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि ताप अशी लक्षणे लगेचच या प्रवाशांमध्ये जाणवली. (Food poisoning)
त्यानंतर अशा प्रवाशांवर तातडीने उपचार करण्यात आले. काहींना रुग्णालयातही पाठवण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या आधी रेल्वेमध्ये अशा घटना झाल्या होत्या परंतु त्यापैकी ही सर्वात मोठी आणि गंभीर घटना आहे. यानंतर हॉस्पिटल आणि प्रशासन हे सक्रिय झाल्या असून प्रवाशांना ताबडतोब उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार
मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर
मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ
ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक
मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता