Thackeray group Loksabha list : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. लोकसभेसाठी एकीकडे भाजप आणि काँग्रेसच्या एकामागोमाग एक उमेदवार यादी जाहीर होत असताना ठाकरे गटाकडून आपली पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. एकुण १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray group) लोकसभेची आपली पहिली यादी जाहिर केली आहे. ठाकरे गटाकडून एकुण १७ जणांची नावं जाहीर केली आहे. औरंगाबादमधून चंद्रखांत खैर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगतीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत.
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ – वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे
सांगली – चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश अष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक – राजाभाऊ वाझे
रायगड – अनंत गिते
सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई ईशान्य – संजय दीना पाटील
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी- संजय जाधव
हे ही वाचा :
मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ
‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा
…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक