Wednesday, May 8, 2024
Homeराष्ट्रीयViral video : अल्पसंख्यांक महिलांना होळीचा रंग, पोलिसांनी दाखवला इंगा

Viral video : अल्पसंख्यांक महिलांना होळीचा रंग, पोलिसांनी दाखवला इंगा

बिजनोर : उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे धामपूर महाराज मंदिराजवळ रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वराला थांबवून आणि त्याच्यामागे बसलेल्या दोन अल्पसंख्यांक महिलांना जबरदस्तीने होळीचा रंग लावण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओतील तीन तरुणांची ओळख पटवून पोलिसांनी स्वतःहून तातडीने कारवाई करत तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये युवकांनी मोटरसायकल तिथून निघताना त्यांच्या मनाविरुद्ध पाणी आणि रंग फेकले. रंग लावल्यानंतर हर-हर महादेवच्या घोषणा दिल्या.

आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत त्या दोन महिला बाईकवर मागे बसल्या होत्या.   बाजारात  होळी खेळत असलेल्या तरुणांनी महिलांना रंग लावला या घटनेचा बहुसंख्य नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय