Sunday, April 28, 2024
Homeग्रामीणसावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयोग

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयोग

माहूर : आज दि. 4 रोजी श्री रेणुका देवी महाविद्यालय माहूर येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) माहूर तालुका कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयोग चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात एसएफआयचे नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर यांनी क्रांतिकारी गीत सादर करून केली. त्यानंतर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य रेड्डी सरांनी शुभेच्छा दिल्या. कॉ. इंगोले सरांनी सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी जीवनावर प्रकाश टाकला. त्यावेळी कॉ. मेघा इंगोले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच भारतीय स्त्रीवाद, स्त्रियांमधील अंधश्रद्धा या विषयावर ही चर्चा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन एसएफआयचे माहूर तालुका अध्यक्ष, जिल्हा कमिटी सदस्य विशाल नरवाडे यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय