Thursday, March 28, 2024
Homeकृषीशेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री व्यवस्थापन योजना कुंभाळे फाटा येथे...

शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री व्यवस्थापन योजना कुंभाळे फाटा येथे आज सुरवात.

 

नाशिक : ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारी ही योजना पेठ तालुक्यात राबवण्यात आली. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री व्यवस्थापन योजना पेठ तालुक्यातील कृषी विभागाणे राबवली. ही योजना कुंभाळे फाटा येथे बोरीचीबारी गावातील धनश्री बचत गटाच्या महिलांना ही योजना राबविण्यात आली.

ही योजना महेश टोपले यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी तरुण कमलेश बोसारे यांनी मिळवून दिली.या योजण्याच्या आधारे शेतकरी महिला आपला माल हा थेट ग्राहकापर्यत पोचवू शकतात अशी माहिती कृषी अधिकारी पगारे यांनी दिली.

या कार्यक्रमाला पेठ चे तहसीलदार उपस्थित होते.त्याचबरोबर मा.उपसभापती महेश टोपले, DYFI चे कमलेश बोसारे,रेणुका बोसारे तसेच बचत गटाच्या आदी महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय