Friday, April 26, 2024
Homeकृषीपिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई पिक पाहणी नोंद सक्तीची नाही

पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई पिक पाहणी नोंद सक्तीची नाही

पुणे : राज्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै आहे. मात्र, या योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीत पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिले.

महाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे . खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2022 असा आहे. शासनाच्या ई – पीक पाहणी मध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही 01 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ही पिक पाहण्याची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

पिक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणी मध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणी मध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही, असेही कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र 01 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई – पीक पाहणी मध्ये आपल्या पिकाची नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

ब्रेकिंग : शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतरावर झाला ‘हा’ निर्णय

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची खा.अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय