Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजिल्हा आरोग्य अधिकारी हंकारे आळंदीत आढावा बैठक

जिल्हा आरोग्य अधिकारी हंकारे आळंदीत आढावा बैठक

साथ रोग रुग्ण तपासणी उपचार, सर्व्हेक्षण सुरू

आळंदी / अर्जुन मेदनकर
: तीर्थक्षेत्र आळंदी परिसरातील साथ रोग आटोक्यात आणण्याचे उपाय योजनेत पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी आळंदी ग्रामीण रूग्णालयास भेट देऊन आढावा बैठक घेत मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, आळंदी ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांचेसह आरोग्य कर्मचारी, विविध पथकात काम करणारे आरोग्य सेवक आदी उपस्थित होते.



या आढावा बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी आळंदी परिसर तसेच खेड तालुक्यातील साथ रोग तपासणी, उपचार, औषध साठा, सर्व्हेक्षण या बाबत सर्व उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक यांचेशी संवाद साधून मार्गदर्शन करीत सूचना केल्या. आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी आळंदी परिसरासह खेड तालुक्यातील साथ आटोक्यात आणण्यास उपाय योजना सर्व्हेक्षण सुरु केले आहे. डोळ्याचे आजाराचे रुग्ण लवकर बरे होण्यासाठी सर्वतोपरी मदत व उपचार, औषध पुरवठा तसेच जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन आरोग्य सेवक परिश्रम पूर्वक आरोग्य सेवा देत आहेत.

सर्व्हे आणि प्रभावी उपाय योजनेमुळे साथ आटोक्यात येत असल्याचे आळंदी ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले. डॉ. उर्मिला शिंदे यांची नियुक्ती आळंदीत झाल्या पासून प्रभावी आरोग्य सेवा सुविधा आळंदी परिसरास मिळत आहे. उपलब्द्ध साधन सुविधा आणि यंत्रणेचा वापर करीत सर्व घटकांशी सुसंवाद साधून आळंदी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत असल्याने आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था चालक तसेच आळंदी परिसरातील नागरिक आळंदी ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांचे कार्याचे कौतुक करीत आहेत. साथ सुरू झाल्या पासून ५० हजार ६१६ तपासणी करण्यात आली. यात ७ हजार २० बाधित आढळून आले आहेत. यातील ४ हजार ७६१ बाधित रुग्ण बरे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी ( दि.२४ ) दिवसभरात १६ हजार ५९४ जणांची तपासणी करण्यात आली. यात ७७७ बाधित आढळून आले आहे. तपासणी संख्येच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट झाली आहे.

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय