Wednesday, May 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकेंद्र व राज्यसरकारच्या निधी आणून शहराचा कायापालट करणार – अजित पवार

केंद्र व राज्यसरकारच्या निधी आणून शहराचा कायापालट करणार – अजित पवार

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मिळालेल्या सत्तेचा पदाचा वापर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आहे. माझे कार्यकर्ते नागरिक या शहरात  पूर्वीसारखेच स्वागत करत आहेत, सर्वांना सभोवतालच्या गर्दीत वेळ द्यावा लागतो. तरी सुद्धा  सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिकांना त्रास होतो, वाहतूक थांबवली जाते, सुरक्षेसाठी रस्ते बंद ठेवावे लागतात. त्यामुळे निम्याच्यावर पिंपरी-चिंचवडकर झोपले असतानाच शहरात येऊन विकास कामांची पाहणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (Deputy Chief Minister Ajit Pawar will transform the city by bringing central and state government funds)

नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी माझी कामाची पद्धत आहे. या शहराचा उद्याची ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून परिपूर्ण विकास करायचा आहे. त्यासाठी कुशल, सक्षम अधिकारी आणून निर्धारित, प्रलंबित पाणी पुरवठा, उड्डाणपूल, स्थापत्यविषयक प्रकल्प, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे अजित पवार यांनी चिंचवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

Deputy Chief Minister Ajit Pawar will transform the city by bringing central and state government funds

आम्ही आमची विचारसरणी सोडलेली नाही

त्यांनी राज्यातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील धरण पाणी पुरवठा व राज्यसरकारच्या जलसंपदा धोरणाचे अभ्यासपूर्ण विवेचन मेळाव्यात केले ते म्हणाले की, या शहरात श्रमिक कष्टकरी वर्ग उदरनिर्वाहारासाठी आलेला आहे. टॅक्स देतात, त्यांना दैनंदिन जीवन सुलभ व्हावे, त्यासाठी प्रशासनाने चोख काम करावे, असा आयुक्तांचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, यावर्षी पाऊस खूप कमी आहे,सप्टेंबरमध्ये पाऊस पडावा, अशी प्रार्थना आहे. राज्यातील पाणी पुरवठा व एकूण जलसंपदेचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यातील व जिल्ह्यातील जलसंपदा व्यवस्थापन सर्वांगीण हितासाठी उपयोगात आणण्याचे राज्यसरकारचे धोरण आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणी पुरवठा पुरेसा केला जाईल. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त धरणे आहेत. शहरातील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी एस टी पी प्लॅन्ट कार्यान्वित केले जातील. पाणी शहरांसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर शेती, उद्योग, पशुधन यासाठी पाणी व्यवस्थापन धोरण सर्वांना समन्यायी असणारे आहे. केंद्र – राज्य सरकारच्या निधी आणून शहराचा कायापालट, निर्धारित प्रकल्प पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या भाषणातून आम्ही आमची विचारसरणी सोडली नसल्याचे तसेच राजकीय घडामोडी पेक्षा उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा फायदा प्रगतीसाठी होईल असा आत्मविश्वास त्यांनी प्रकट केला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी पार पडला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, राहूल भोसले, विनोद नढे, श्याम लांडे, संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, विशाल वाकडकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Deputy Chief Minister Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawar
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय