Covid-19 Vaccine : करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी घेण्यात आलेल्या कोविशिल्ड लसीसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोविड लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या सर्व दाव्यांच्या दरम्यान, लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने एक मोठा खुलासा केला आहे. कोविड -19 लसीमुळे दुष्परिणाम होऊ शकतात, असा दावा केला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
करोना महामारीपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना लस देण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेका कोविड लस Covishield आणि Vaxzevria सह अनेक नावांनी जगभर विकली गेली. सध्या या लसीमुळे होणाऱ्या मृत्यूंसह अनेक गंभीर आजारांबाबत ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने विकसित केलेल्या लसीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचा आरोप कंपनीवर आहे.
न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, कंपनीने प्रथमच कबूल केले आहे की, कोविड -19 लसीमुळे दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु अशा प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्याचा दावा केला गेला आहे. कंपनीच्या या दाव्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे.
Covid-19 Vaccine कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका
एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या करोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. कंपनीने असंही सांगितलंय की, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल आणि सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही.
ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याचं दिसून आलं. इतर अनेक कुटुंबांनीही लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात तक्रारी केल्या आहेत.
AstraZeneca ने काय दिली नेमकी कबूली?
यूके उच्च न्यायालयात उत्तर देताना, कंपनीने मान्य केलंय की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कबुली देऊनही कंपनी लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध करत आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स
अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली
निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !
ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह
ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल
केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!
NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त
SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !