Monday, May 20, 2024
Homeराजकारणढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

मुंबई, दि. ८ : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

ब्रेकिंग : थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान, आजपासून आचारसंहिता लागू

रेशन कार्ड धारकांची संख्या कमी करण्यास विरोध – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

एकाच महिला पोलीसाच्या प्रेमात पडले 2 पोलीस कर्मचारी ; पोलीस स्टेशन मध्ये जोरदार राडा !

मेगा बजेट 500 कोटींचा चित्रपट पी एस 1चा ट्रेलर लाँच !

मॅक्स महाराष्ट्र (Max Maharashtra) चॅनेल युट्यूबने केला बंद, संपादकाची भावनिक पोस्ट

नवीन भरती : छावणी परिषद, देहूरोड येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय