Saturday, May 18, 2024
Homeराजकारणशरद पवार यांना धमकी देणाऱ्याचे या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल, धमकी देणारा...

शरद पवार यांना धमकी देणाऱ्याचे या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल, धमकी देणारा कोणत्या पक्षाचा ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. ‘शरद पवार भाडखाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी देण्यात आली आहे.

यामध्ये पहिली धमकी ही ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरुन ‘नर्मदाबाई पटर्धन’ नावाच्या आयडीवरुन देण्यात आली आहे. तर दुसरी धमकी ही ‘सौरभ पिंपळकर’ नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर दिली आहे. या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. धमकी देणाऱ्यांपैकी सौरभ पिंपळकर हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातोय. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटवर फोटो शेअर केला आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं ?

‘हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?’, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. आता भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे नेमकी काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिटकरी यांच्याकडून आणखी दोन फोटो ट्विट

विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना फोटो शेअर केलाय. एक व्यक्ती दानवे यांच्याबद्दलचे मत मांडत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दानवे यांनी आपल्याला सोशल मीडिया संबंधित आयोजित कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, असं त्या फोटोमध्ये लिहिलेलं बघायला मिळत आहे. या फोटोलाही मिटकरी यांनी हे रक्त कुणाचं? असं कॅप्शन दिलं आहे.

‘…तुझा लवकरच दाभोळकर होणार’ अशाप्रकारची धमकी

फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्राचे या पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. ‘शरद पवार भाडखाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने

गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!

‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


नोकरीच्या बातम्या वाचा :

पुणे महानगरपालिका अंतर्गत 447 पदांसाठी भरती; 8वी, 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, डी.एड., बी.एड. धारकांना नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत विविध पदांची भरती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय