Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरयत क्रांती संघटनेच्या वतीने खेड तालुक्यात 'क्रांती दिन' साजरा

रयत क्रांती संघटनेच्या वतीने खेड तालुक्यात ‘क्रांती दिन’ साजरा

. : काळुस ता. खेड जि. पुणे येथे खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीने बुधवार दि.९ ऑगस्ट २०२३रोजी ‘हुतात्मा दिन’ साजरा केला. या कार्यक्रमात क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी वीज दरातील वाढ, विजे बाबतची अनियमित, शेतीसाठी व इतर पाणीपट्टीतील वाढ या संदर्भातील शासनाचा निर्णय, शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध ज्वलंत प्रश्न यासारख्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. व त्याबाबत लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.

खेड तालुक्यातील काळूस गावाच्या परिसरातील शेत जमिनीवर भामासखेड /चासकमान प्रकल्प अंतर्गत टाकलेली ४० वर्षापासून टाकलेले शिक्के काढण्याबाबतचा निर्णया बाबतची त्वरित अंमलबजावणी करावी ‌‌अन्यथा क्रांतिकारी आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत खऱ्या अर्थाने जाण असल्याकारणाने अशा अनुभवी शेतकरी नेत्याला मंत्रिमंडळ स्थान मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी मागणी या निमित्ताने शेतकऱ्यांनी केली.

याप्रसंगी खेड तालुका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुभाषराव पवळे, कुणबी संघाचे प्रमुख आप्पासाहेब कड, गजाननराव गांडेकर, बाळासाहेब दौंडकर, विठ्ठलशेठ आरगडे, विश्वास पोटवडे, बाळासाहेब दौंडकर, यांच्यासह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. 

कार्यक्रमासाठी भरत आरगडे, दत्ता खलाटे, सुरेश कौंटकर, बारकू जाचक, सुनील पोटवडे, सुदाम पोटवडे, विलास खैरे, पाटीलबुवा आरगडे, सारिका पठारे, सुवर्णा पवळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेचे प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी लाभले.

Lic
Lic life insurance corporation
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय