Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभूगर्भातून भीतीदायक आवाज येत आहेत,गावकरी भयभीत

भूगर्भातून भीतीदायक आवाज येत आहेत,गावकरी भयभीत

महाड : महाडच्या कसबे शिवथर (जिल्‍हा रायगड) गावात गेले २ दिवस भूगर्भातून मोठे आवाज येत आहेत. त्‍यामुळे ग्रामस्‍थांमध्‍ये याची चर्चा चालू असून भीतीचे वातावरण आहे. काहींनी मंदिराच्‍या परिसरात आसरा घेतला आहे. आवाजांचे गूढ शोधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, एनडीआरएफ टीमने गावाला भेट दिली आहे.

त्याचबरोबर ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला असून सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आला आहे. तसंच, भूगर्भ तज्ञांची टीम सोमवारी गावाला भेट देणार आहे.दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या गावात ७० ते ८० घरं आहेत.४ ऑगस्ट रोजी दिवसभर अधून मधून आवाज येत होते. तर, त्याच रात्री जमिनीतून मोठा आवाज झाला.



दरवर्षीच्या पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील काही भाग हा दरड कोसळणे, भूगर्भात घडणाऱ्या घटना यासाठी काहीसा संवेदनशील बनला आहे.महाडचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी संपूर्ण परिसरात महसूल कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच एनडीआरएफच्या टीम सह गावाला भेट दिली. प्रशासनाच्या पथकाने दिवसभर पाहणी केली. मात्र त्यांना यामागची कारणे अद्याप समजू शकली नाहीत. या टीमने ग्रामस्थांना धीर देत सतर्क राहण्यास सांगितले आहे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय