Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजेष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचे निधन

जेष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे मुंबई येथे निधन झाले आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध होते.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून ते काम करत होते. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहित होते. फेसबुकवही ते लिखाण करतात. प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असलेले हरी नरके परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी एक प्रमुख मार्गदर्शक होते.

त्यांनी १९७९ मध्ये त्यांनी पिंपरी येथील टाटा मोटर्स (पूर्वीची टेल्को) कंपनीत ते प्रशिक्षणार्थी म्हणून काही काळ काम केले. वैचारिक परिसंवाद, उत्कृष्ठ अभ्यासपूर्ण विवेचनातून ते प्रतिगामी उजव्या विचारांचे खंडन करत असत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय