Saturday, May 18, 2024
Homeजुन्नरब्रेकिंग : जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी घेतला मोठा निर्णय

ब्रेकिंग : जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी घेतला मोठा निर्णय

जुन्नर : अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडली. अजित पवार यांच्या सोबत जवळ जवळ ३२ आमदार तर शरद पवार यांच्या सोबत १६ आमदार असल्याचे समोर आले आहे. या फुटीमुळे अनेक आमदारांसह कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे निर्माण झालेल्या पेचात तटस्थ राहण्याची भुमिका आमदार अतुल बेनके यांनी घेतली आहे. तसेच, २०२४ ची येणारी निवडणूकही लढणार नाही असं त्यांनी जाहीर केले आहे.

आमदार अतुल बेनके हे सुरुवातीला अजित पवार यांच्या सोबत होते. तसेच त्यांनी अजित पवार यांच्या पत्रावर सही देखील केली. मात्र कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर त्यांनी आपली भूमिका “तटस्थ” असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे देखील जाहीर करून टाकले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा :

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय