Sunday, April 28, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यातील ही गावे वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेलेची

जुन्नर तालुक्यातील ही गावे वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेलेची

जुन्नर(प्रतिनिधी) :- जुन्नर तालुका हा सधन म्हणून ओळखला जातो. कुकडी प्रकल्पांतर्गत या तालुक्यात माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे आणि चिंल्हेवाडी पाझघर ही पाच धरणे आहे. परंतु हे असतानाही जुन्नर तालुक्यात कोपरे, मांडवे, पेठेचीवाडी, उंडेखडक, निमगिरी, खटकाळे, देवळे, घोटमाळ, तळेचीवाडी, आंबे, हातवीज, हिवरे पठार आदी गावात आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. आक्टोबर संपला की बऱ्याच गावात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट आहे. अनेक गावात तर दररोजच्या वापराचे पाणी सुध्दा डोक्यावरून वाहून आणवे लागते. 

          निवडणूका आल्या की आमदार, खासदार येतात, आश्वासने देऊन जाता, परंतु आजपर्यंत आदिवासी भागाची परवड थांबलेली नाही. लोकप्रतिनिधी फक्त नावाला असून भाषणे ठोकणारे झालेले आहे, अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहे.         

          देवळे गावातील रोहिदास बोऱ्हाडे म्हणतात, “देवळे गावातील चिंचेचीवाडी, घोटमाळ आणि इतर वाड्यांची समस्या अतिशय गंभीर आहे. लोकांना पाण्यासाठी नंबर लावावे लागतात. लोकांना रात्रभर जागून पाणी भरावे लागते. अशी दैनिक अवस्था असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देताना दिसत नाही. तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे टँकर मागवले जातात, परंतु पाण्याची समस्या पुर्णतः सोडवली जआत नाही.” यावरून टँकर लॉबी अस्तित्वात तर नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

         खटकाळे गावातील शाळेत शिकणारी निकिता मोरे म्हणते, “आमचे गाव असे आहे, की येथे टँकर पण दिले जात नाही. पाण्यासाठी दुसरीकडे जावे लागते, पिण्याचे पाणी केवाडी गावातून गाडीवर आणावे लागते. कापडे धुण्यासाठी लय लांब म्हणजे ४ किलोमीटर वर जावे लागते. इतर गावात टँकर येतात, पण आमची ग्रामपंचायत ते पण करत नाही. सरपंच असून नसल्यासारखे आहेत.”

            अशी गंभीर परिस्थिती असताना गावपातळीवर आणि तालुका पातळीवर कोणतेही उपाय केले जात नाही, हा प्रश्न जनता करत आहे. टँकर पाठवून तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाने येणाऱ्या वर्षभरात तरी या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय