Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ही महिला संघटना ‘१ जून’ अन्न व रोजगार मागणी दिन म्हणून करणार आंदोलन.

---Advertisement---

मुंबई(प्रतिनिधी):- लॉकडाऊन परिस्थिती असताना लाखो कष्टकरी, वंचित समूह संकटात आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने १ जून रोजी देशभरात देशभर अन्न व रोजगार देण्याची, तसेच हिंसाचार त्वरित थांबवण्याची मागणी करण्यासाठी शारिरीक अंतर राखून निदर्शने करण्यात येणार आहेत, असे जनवादीच्या राज्य अध्यक्ष नसिमा शेख आणि राज्य सचिव प्राची हतिवलेकर यांनी म्हटले आहे.

        प्रसिध्दीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सबंध लॉकडाऊन दरम्यान मोदी सरकारने आपले खरे व अत्यंत असंवेदनशील रूप दाखवले. कुठलीही पूर्वतयारी न करता अचानक लॉकडाऊन जाहीर केला. लोकांची आपल्या घरी पोहोचण्याची, हातावर पोट असलेल्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची, आजारी असलेल्या, कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याची सोय तर केंद्राने केली नाहीच, उलट पंतप्रधानांनी आपल्या अत्यंत रटाळ भाषणांतून टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा असले फालतू कार्यक्रम राबवण्यावर भर दिला. त्यांच्या एकाही भाषणात स्थलांतरीत मजूर, रोजगार बुडाल्यामुळे उपासमार सहन करीत असलेली जनता, लॉकडाऊनमुळे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात झालेली लक्षणीय वाढ, या कशाचाही साधा उल्लेखही झाला नाही. या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून १ जून रोजी सबंध देशभर सकाळी वस्त्यांमध्ये, गावात हातात मागण्याचे फलक घेऊन निदर्शने करण्यात येणार आहेत.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :-


१. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आयकर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात सरकारने दरमहा ७,५०० रुपये टाकावेत.

२. सर्व गरजूंना पुढील किमान ६ महिन्यांपर्यंत १० किलो धान्य मोफत द्या.

३. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू मोफत द्या.

४. मागणी करणाऱ्या प्रत्येकाला मनरेगामार्फत २०० दिवस काम द्या.

५. नगर पंचायत भागांतही मनरेगा सुरू करा.

६. शहरी बेरोजगारांकरता रोजगार हमी योजना त्वरित सुरू करा.

७. कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचार त्वरित द्या.

८. अनैच्छिक गर्भधारणा रोखण्यासाठी मोफत गर्भनिरोधके पुरवठा करा.

९. सीएए-एनआरसी-एनपीए विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आकसाने अटक करणे त्वरित थांबवा. तसेच अटकेत असलेल्यांची त्वरित सुटका करा.

१०. हिंसाचाराला बळी पडलेल्यांना, विशेषतः महिलांना सुरक्षा द्या.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles