Saturday, May 11, 2024
Homeराज्यपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वजन कल्याणकारी पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या...!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वजन कल्याणकारी पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या…!

          भारतात खऱ्या अर्थाने समाज सुधारकांची चळवळ इंग्रजांच्‍या राज्यात महात्मा फुले यांनी सुरू केली. हाच आदर्श घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी राजे असुनही समाज सुधारकाचे काम केले. सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरस पेरियार रामास्वामी, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाज सुधारकाचे काम केले. भारतीय स्‍त्री तर कोणत्‍याही जाती धर्माची असली तरी तिला शुद्र म्‍हणूनच वागणूक मिळत होती. अशा काळात थोर क्रांतिकारी सामाजिक राज्‍यकर्त्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होऊन गेल्या.

            महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतातील पहिल्या क्रांतिकारी समाजसुधारक महिला राज्यकर्त्या ठरतात. अहिल्यादेवी चा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा टकेपार लावणारे आणि मध्‍य प्रदेशात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे मल्हार रावजी होळकर हे अहिल्यादेवीचे सासरे होते. त्यांनी प्रजेच्या हिताचे  सुख शांतीचे राज्य निर्माण केले. राजाचा वारसा पुत्र खंडेरावाचा मृत्‍यू झाला. रुढी परंपरेने सती जाण्‍याची वेळ अहिल्यादेवी वर आली, अहिल्यादेवीला सती न जाऊ देता; तिच्या हाती राज्‍यकारभार संपविण्याचे काम मल्हाररावांनी केले. अहिल्यादेवीने सती जाण्‍याचा रुढी रिवाज तोडून लोक निंदेला ना जुमानता आपण मेलो तर आपल्याला सुख मिळेल.  परंतु जगलो तर आपल्‍या लाखो प्रजाजनांना ख मिळेल. म्‍हणून सती न जाण्‍याचे ठरवून रूढीग्रस्त धर्माच्या विरुद्ध क्रांतिकारी पहिले बंड केले.

            भारतीय स्‍त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्‍हता त्याविरुद्ध क्रांतीकारी दुसरे बंड करुन अहिल्यादेवींनी राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतली. कुटुंबातील सासरा नवरा मुलगा या सर्वांच्‍या मृत्यूनंतर जनकल्याणासाठी मनोधर्य खचून न देता धैर्याने अहिल्‍याबाईंनी राज्‍यकारभार संभाळला. त्यांंचा जास्तीत जास्त वेळ समाज कल्‍याणासाठी देत अहिल्यादेवींनी प्रजेला त्रास देणाऱ्या पकडून आणून सामोपचाराच्या गोष्टी सांगून त्‍यांना जगण्‍यासाठी जमिनी देऊन चांगल्या मार्गाला लावले. त्याचे संसार सुखा समाधानाने फुलविले प्रजेचा छळ न करता प्रजेला परवडेल, एवढाच कर वसूल केला. करापासून वसूल केलेला पैसा लोकांच्या हिताकरिता खर्च केला. संपत्‍ती ही व्यक्तिगत मालमत्ता नसून देवाने आणि जनतेने योग्य रितीने विनियोगण्याकरिता आपल्‍या स्‍वाधीन केलेला तो एक ठेवा आहे, असे त्‍या समजत.             वारसा नसेल तर दत्तक घेण्याचा व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार अहिल्यादेवींनी प्रजेला दिला होता. प्रजेचे सुख-दुःख स्‍वतः प्रत्‍यक्ष ऐकून घेऊन भेटण्‍यासाठी प्रजेला वेळ देत आणि स्वतः न्यायाधीशाच्या प्रमाणे काम करीत. अहिल्यादेवीच्या राज्‍यात जातीभेदाला थारा नव्‍हता. त्या प्रजा सारखीच मानीत असत याचा परिणाम असा होईल की विविध राज्यातील लोकसुद्धा आम्‍ही तुमच्‍या राज्‍यात राहायला येतो असे म्हणत. एकंदरीत अहिल्यादेवींच्या राज्यात जनता संतुष्‍ट व सुखी होती.  कारण प्रजेचा संतोष हाच राज्‍याचा पाया आहे, असा अहिल्‍याबाईंचा विचार होता. प्रजेचा सांभाळ लेकरा प्रमाणे करणे हा राजधर्म असल्याचे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर मानत. कारभारातील कोणत्‍याही अधिकाऱ्याने अथवा जवळच्‍या माणसाने प्रजेकडून पैसे उकळले, तर अहिल्यादेवी त्‍याला ताबडतोब शिक्षा करीत आणि त्‍याचे अधिकार काढून घेत. त्याचा प्रशासनावर वचक होता. सर्व जनतेला न्याय मिळावा. म्‍हणून न्‍यायालयाची स्‍थापना, गावागावात पंचायतीची स्थापना, न्याय मिळविण्यासाठी अर्ज करण्याची व्यवस्था, प्रत्यक्ष राजाला भेटून न्याय मिळविण्याची व्यवस्‍था, पोलीस यंत्रणा, गावोगावी कोतवालाची पदे निर्मीती तसेच कृषी आणि वाणिज्‍य क्षेत्राच्या उत्कर्षावर जास्त भर देऊन शेतकऱ्यांना चांगली वागणूक दिली.

              प्रजेसाठी रस्‍ते, पुल, घाट, धर्मशाळा, विहीरी तलाव बांधले. बेरोजगारांना रोजगार मिळण्‍यासाठी रोजगार धंद्याची योजना राबविण्‍यात आली होती। रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी वृक्षरोपण केले होते. भाविक गोर-गरीब लोक तीर्थ यात्रेला जात असत व तेथे त्‍यांची गैरसोय होऊ नये. म्हणून अन्नदानाची छत्रे राहण्यासाठी धर्मशाळेची सोय हे फक्त होळकरांच्या राज्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतातील इतर राज्‍यात सुध्‍दा प्रत्‍येक  तीर्थयात्रेच्या ठिकाणी सोय अहिल्यादेवींनी उपलब्ध केल्या होत्या. अहिल्यादेवींनी शत्रूचा बंडवाले समाज घटकांचा बिमोड करून त्याचे पुनर्जीवन केले आणि राज्यात शांतता प्रस्थापित केली राज्यकारभार समाज व्‍यवस्‍था कायदे कानून वगैरे बाबत सुधारणा केल्या. त्‍यामुळे प्रजा अहिल्‍याबाईंच्‍या सामाजिक राजकीय कार्यावर संतुष्‍ट होती. अहिल्याबाईंचे राजकारण एकंदरीत शांततेचे होते. त्यामुळे राज्यात शांतता व सोबत लाभली याची नोंद पंडीत नेहरुनी देखील केली होती. म्हणूनच त्यांना शांतताप्रिय राज्यकर्ते असे म्हणतात. अहिल्यादेवींने इ.स १७५५ ते १७९५ या दीर्घ कालावधीत राज्य केले. १३ ऑगस्ट १७९५ रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा मृत्यू झाला. अहिल्यादेवीच्या राज्‍य कारभाराबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल राठी उर्दु इंग्रजी कवी लेखकांनी फार मोठ्या प्रमाणात साहित्‍य लिहून ठेवलेले आहे. इतर राज्याची तुलना केली, तर त्‍या काळात अहिल्‍याबाई फार मोठ्या सामाजिक क्रांतिकारक राज्‍यकर्त्‍या होऊन गेल्‍या हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट सत्य समोर येते स्वातंत्र्यानंतर 45 वर्षात लोकशाही प्रशासनाच्या योजनेत अनेक कलमी कार्यक्रम राबविले जात आहेत. ते सर्व लोक मातेच्या राज्‍यात राबविण्‍यात आलेले दिसून येते.  अहिल्यादेवींचा प्रशासनावर फार मोठा वचक असल्यामुळे त्या समाजाला न्याय देऊ शकल्या धार्मिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आघाडीवर महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी तब्बल 30 वर्षे समर्थपणे राबविलेल्या शासन यंत्रणेतून क्रांतिकारक कार्य केले. यातून राजमातेची शक्‍ती आणि युक्‍ती दिसून येते. त्या केवळ धनगर समाजाच्याच नव्हे तर तमाम भारतीय जनतेच्या आदर्श ठरतात. 

              लोकमातेच्या धार्मिक सांस्कृतिक आर्थिक सामाजिक आणि मुख्यत्व राजकीय प्रेरणा स्त्रोतातून किमान एक पेलू घेऊन धनगर तत्सम राष्ट्रीय समाजाने वाटचाल केली असती तर भारत भारतीय समाज आज एक मागास दुबळा देश समाज म्हणून ओळखला गेला नसता. सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून ते होळकरांपर्यंत वैभवशाली व कल्याणकारी परंपरा असताना धनगर समाज पर्याय शासकीय प्रशासकीय आर्थिक राजकीय भागीदारी पासून वंचित आहे. सर्व प्रकारच्या समतेची आम्ही भारतीय राज्यघटनेने भारतीय जनतेला दिली आहे. सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासाला वाव देणाऱ्या विविध तरतुदी आपल्या प्रजासत्ताक भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतभूत आहे. असे असताना भारताच्या स्वातंत्र्याची ६५ वर्षे व भारतीय प्रजासत्ताकाची ६५ वर्षे उलटून जाऊनही राष्ट्रीय जीवनाच्या विविध क्षेत्रातील भागीदारी पासून वंचित का? तर याचे एकमेव कारण म्हणजे धनगर समाजाच्या हिताची जपणूक करणारा आजवर एकही प्रतिनिधी संसदेमध्ये गेला नाही.  महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या १७ टक्के असताना सुद्धा एकही खासदार आजपर्यंत निवडून का पाठविला नाही? महाराष्ट्र विधानसभेत लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के आमदार दर वेळी निवडून जायला हवेत पण आजपर्यंत कुठल्याही विधानसभेचे चार ते पाच त्यावर प्रतिनिधी गेले नाहीत याला जबाबदार कोण? धनगर समाजात राजकीय जागृतीचा अभाव हे प्रमुख कारण म्हटले, तर वावगे ठरणार नाही. 

              किंबहुना धनगर तत्सम इतर समाजाच्या मागासपणाचे कारणही हेच आहे. आदिवासी, मातंग, बौद्ध, लिंगायत, मुस्लिम, साळी, माळी, कोळी, तेली, वंजारी, सर्व समाजात पुण्यश्लोक अहिल्यादेवी बद्दल मला आदर भाव आढळला. परंतु मराठी साहित्यात पुण्यश्लोक कोठे आहे? अहिल्यादेवींच्या नावाने महाराष्ट्रात एकही सांस्कृतिक केंद्र का नाही? वृत्तपत्रे दूरदर्शन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे दर्शन का नाही? असे प्रश्न मला पडतात. केवळ धनगर वाड्यातच अहिल्‍याजयंती व पुण्यतिथी का असावी प्रश्न मला पडतो. तसेच यात समाजाचा मराठी माणसाचा दोष नसून हा प्रचार-प्रसार यंत्रणेचा दोष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे वारस देखील कमी पडले. पुण्यश्लोक असूनही अहिल्‍यादेवी उपेक्षित आहे त्याला जबाबदार कोण आहे. आजमितीला संपूर्ण राज्यामध्ये इतर राष्ट्रपुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी सर्व जाती धर्माचे लोक करतात. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती धनगर समाज सोडता इतर जातीमध्ये साजरी केली जात नाही. त्याला तितकेच जबाबदार धनगर समाजातील पुढारी देखील आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा खऱ्या अर्थाने राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी ३० वर्षे सांभाळला सर्वजन कल्याणकारी राज्य कारभारामुळे प्रजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जनता अहिल्यादेवी मानू लागली. अहिल्यादेवींनी राज्यकारभारासाठी तलवारही पकडली होती, म्हणून इंदूरच्या वाटेला कोणी जात नव्हतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा चेहरा लोकांसमोर आणला गेला होता. परंतु तलवारधारी महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाईचा राज्यकर्ता चेहरा लपविला गेल्या. १९९४ साली तलवारधारी महाराणी अहिल्याबाई यांचा प्रचार हा सर्वप्रथम बहुजन समाजातील साहित्य संजय सोनवणे त्याचबरोबर हरी नरके यांनी सत्य समोर आणले. त्यांना गैरसमजातून टिका टवाळी झाली त्यांनी सहन केली व त्यांनी जबाबही दिले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचे सामाजिक आणि राजकीय स्वरूप समोर आणण्याचे काम साहित्यिकांनी केले. 

            राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर राजकर्त्या होत्या, म्हणून राजकारण करु शकल्या। परंतु राज्यकर्ता धनगर समाज आपला मोठा वारसा विसरला. राजा समाज, प्रजा समाज बनला केवळ  वोटर समाज बनला. समाजातील राज्यकर्त्या नेत्यांमुळे आजमितीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घेऊन उतरलेल्या नेत्यांना खुद धनगर समाजाचा विसर पडला आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत स्वखर्चातून मज्जित मंदिर त्याचबरोबर पशुपक्ष्यांसाठी पाणवठे दऱ्यांमध्ये बांधण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या राज्यकर्त्या होत्या. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी त्यांच्या राज्यकारभार मध्ये केले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नशीब २९ व्या वर्षी विधवापण आलेले होते. इ,स  १७९९ मध्ये अहिल्यादेवीचे सासरे महाराज मल्हाराव होळकर यांचे निधन झाले. होळकरांचा आधारस्तंभ कोसळला. आता मालेराव हा एकमेव आधार होता परंतु त्या खचल्या नाहीत. इंदूर संस्थानाचे सारी सूत्रे आपल्या हातात घेऊन तीस वर्ष ना भूतो ना भविष्य आता राज्यकारभार केला. अशा महान मातेला त्यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

दत्ता वाकसे

बीड 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय