Sunday, May 12, 2024
Homeराज्यMumbai : 21 व्या दिवशीही आशा व गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर आक्रोश 

Mumbai : 21 व्या दिवशीही आशा व गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर आक्रोश 

Asha Workers Protest : ‘फक्त आश्वासन नको, ताबडतोब शासननिर्णय जाहीर करा’, ‘जीआरचा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही’, असा निर्धार करत आझाद मैदानावर राज्यातील हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे २१ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. Asha Workers Mumbai 

उन्हामुळे उष्माघाताच्या त्रासाने अनेक महिला आजारी पडल्या, तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. मैदानात प्रचंड गैरसोय असतानाही त्यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत जीआर निघणार नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा निर्धार आशा व गटप्रवर्तकांनी केला आहे.

आशा सेविकांना 7 हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये आणि सर्वांना 2 हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र, अद्याप तसा शासननिर्णय जाहीर झाला नसल्याने 21 दिवसांपासून ऊन आणि थंडीची पर्वा न करता हजारो आशासेविका व गटप्रवर्तक महिला आंदोलन करत आहेत.

सध्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्या काम करत आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये आशासेविकांनी बेमुदत संप पुकारला होता. तेव्हा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविकांना 7 हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. शिवाय सर्वांना 2 हजार रुपये दिवाळी भेट दिली होती. त्याचा महिनाभरात शासन आदेश जारी केला जाईल, असे आश्वासन दिले होते. तीन महिने उलटूनही संबंधित शासन आदेश अजून निघालेला नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांचे मुंबई च्या आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू आहे.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Bharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 पदांची भरती

DRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10वी, पदवी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय