Salman Khan : बाॅलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापरने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.
Salman Khan च्या घरावर झाला होता गोळीबार
अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२३ रोजी गोळीबार झाला होता. १४ एप्रिल रोजी पहाटे सलमान खान घरात असताना त्याच्या घराबाहेर फायरिंग झाल्यावर सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु करत अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेतलं. गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर (३७) व अनुज थापन (३२) यांना दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्यातील अनुज थापनने आत्महत्या केली.
समोर आलेल्या माहितीनूसार अनुजने शूटर्सला फायरिंगचे शस्त्र पुरवल्याचं म्हटलं आहे. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर यामध्ये अनुजचा समावेश असल्याचं समोर आलं.
बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. त्या पिस्तुल देण्यासाठी चंदर व थापन दोघेही १५ मार्चला पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. पिस्तुल गुप्ता व पाल यांना देण्यापूर्वी चंदर व थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील इतर दोन आरोपींना जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात आलं होतं, त्यावेळी थापन इतर १० आरोपींसह एका कोठडीत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला आणि तिथे त्याने आत्महत्या केली. यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या जीटी रुग्णालयात दाखल नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी
मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ
संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स
IIIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती
AIIMS : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अंतर्गत भरती
अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली
निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !
ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह
ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल
केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!
NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती