Karishma Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. 90 च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या करिश्माने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभव सामायिक केले आहेत.
करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते, मात्र वैवाहिक जीवनातील सततच्या वादांमुळे त्यांचे नाते टिकू शकले नाही, आणि 2003 साली त्यांचा घटस्फोट झाला. मुलाखतीदरम्यान करिश्माने तिच्या हनीमूनचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला.
करिश्मा म्हणाली, “हनीमूनच्या रात्री संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला भाग पाडले. मी नकार दिला तेव्हा त्याने मला मारहाण केली. इतकेच नाही, तर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर लिलाव केला.”
करिश्माने तिच्या गरोदरपणातील छळाचाही उल्लेख केला. ती म्हणाली, “माझ्या सासूबाईंनी गर्भावस्थेत माझ्यासाठी एक ड्रेस आणला होता, पण तो मला बसत नव्हता. तेव्हा संजयने माझ्या सासूबाईंना मला मारायला सांगितले.”
करिश्माने सांगितले की, लग्नानंतरही संजय कपूरचे त्याच्या माजी पत्नीसोबत संबंध होते, ज्यामुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढले.
करिश्मा कपूरच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले असून, तिच्या या खुलाशामुळे कुटुंबातील महिलांच्या छळाविरोधात उभे राहण्याचा संदेश दिला जात आहे. करिश्मा कपूरच्या धक्कादायक वैवाहिक आयुष्यातील कटू अनुभवांमुळे बाॅलिवूड हादरलं.
Karishma Kapoor
हेही वाचा :
मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव
रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य