आळंदीतील मेळाव्यात माजी खासदार आता होणार खासदार यासाठी निर्धार
आळंदी : खेड तालुक्यातील उर्वरित विकास कामांसाठी तसेच पुढील काळात २४ हजार कोटी निधी रेल्वे साठी सत्ताधारी खासदार पाहिजे. चाकण वाहतूक कोंडी वाढली, तळेगाव चाकण शिक्रापूर वाहतूक कोंडी, वाघोली पुणे रस्ता विकास निधी ५० हजार कोटी निधी पाहिजे. यासाठी आपल्या हककाचा माणूस मिळावा. आता होत असलेल्या प्रचारातील भुल थापांना बळी पडू नका असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आळंदीत केलेशिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचे प्रचारार्थ गावभेट संवाद मेळावा आळंदीत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेशी संवाद साधताना माजी खासदार आढळराव पाटील बोलत होते. यावेळी आमदार दिलीप अण्णा मोहिते, मनसेचे जिल्हाध्यक्ष पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार, अनिल बाबा राक्षे, संदीप सोमवंशी, कैलासराव सांडभोर, प्रकाश वाडेकर, अरुण चौधरी, सभापती शांताराम कैलास लिंबोरे, डी.डी. भोसले पाटील, शिवसेनेचे आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, किरण येळवंडे, धनंजय पठारे, रुपाली पानसरे, नियती शिंदे, संगीता फाफल, योगेश पगडे, विकास थोरवे प्रकाश कु-हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. Alandi news
डॉ. विकास थोरवे म्हणाले, महायुती मित्र पक्ष आघाडीचेच उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे यापुढील खासदार असतील. ते येथून भरघोस मतांच्या लीडने विजयी होतील. त्यांचा विजय सुकर होण्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ताकत देण्याचे काम करतील अशी ग्वाही आळंदी पंचक्रोशीचे वतीने त्यानी दिली.
माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी संवाद साधत येथील प्रश्न समस्यां कायम असून दादांचे माध्यमातून येथे विकास झाला असल्याचे सांगून महायुतीचे उमेदवार म्हणून दादा आपल्या सर्वांसमोर संवाद साधण्यासाठी आलेले आहे. त्या निमित्ताने असणारे काही प्रश्न आहेत आपण दादा समोर मांडत आहे. भविष्य काळामध्ये त्या प्रश्नांची सोडवणूक करणे काळाची गरज आहे. विद्यमान खासदारांना आम्ही स्वतःच्या खिशातून खर्च करून वेळ देऊन निवडून आणले. मात्र त्यांनी भ्रम निराश केले. परंतु या आळंदी शहरांमध्ये त्यावेळेस त्यांनी जनता दरबार घेतला प्रश्न मात्र सुटले नाहीत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आळंदी शहरासाठी २१७ कोटींचा विकास आराखड्याची कामं मंजूर करीत विकास केला आहे. इंद्रायणी नदी घाटावरील पायर्या कमी करून वारकरी भाविकांचे दर्शन सुलभ करण्याचे आश्वासन देऊन परत फिरकले नाहीत. कार्यकर्त्यांनी मागील वेळी केलेली चूक यावेळी दुरुस्त केली जाणार असल्याचे सांगत आमदार दिलीप मोहिते पाटलांनी आत्तापर्यंत ५६ कोटीची कामे आळंदीत केल्याचे सांगितले. उर्वरित रस्ते, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करावी असे सांगितले. किरण येळवंडे म्हणाले महायुतीचे काम करून जास्तीत जास्त मतदान आळंदीतून होईल अशी ग्वाही दिली. Alandi news
मनसे राजेंद्र बाबू वागस्कर, आमदार दिलीप मोहिते, निर्मला पानसरे आदींनी मनोगते व्यक्त करीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमातंर निवडून देण्याचे आवाहन केले. मनसे पदाधिकारी देखील प्रभावी प्रचार करतील अशी ग्वाही वागस्कर यांनी दिली.
ख-या अर्थाने खेड (Khed) तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम पालकमंत्री अजितदादा पवार, आमदार दिलीप अण्णा मोहिते यांनी केले आहे. यापुढील काळात आपले खासदार आढळराव असणार आहेत. त्यांचे माध्यमातून उर्वरित शिरूर लोकसभेच्या मतदार संघाचा विकास निश्चित होईल. यासाठी दादांचे आणि अण्णांचे हात बळकट करण्यासाठी दादांना साथ द्या असे आवाहन निर्मला पानसरे यांनी केले. सक्षम नेतृत्व या ठिकाणी द्यायचं आहे. येत्या १३ तारखेला घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून शिवाजीदादा आढळराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, आळंदीत निवडणूक आली की, मी फार सावध असतो. माउलींना आशीर्वाद मागतो. यापूर्वी दादांना येतुन अधिक मताधिक्य दिले आहे. आळंदीत आता महायुती आहे. आळंदीत आता काही काळजी करायची गरज नाही. भीमाशंकर पासून सुरुवात केली. आळंदीला आलो. आळंदीचा विकासासाठी कुणी योगदान दिले आहे. हे सर्वांस माहिती आहे. संत तुकाराम महाराज यांचे ४०० व्या जयंती निम्मित तीर्थक्षेत्र विकासास मोठा निधी मंजूर केला. देवस्थाने तिथक्षेत्र विकास आराखडा तयार करून नागरी सेवा सुविधा दिल्या आहेत. यात सुमारे २५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्द्ध करून दिला. यातून येथील विकास साधला आहे. या पुढील काळात अधिकचा विकास साधण्यासाठी आता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार मोहिते पाटील यांनी केले. यावेळी येथे झालेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी मांडला. खेड तालुक्यात आळंदी – चाकण महापालिका करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या वस्ती विकास, उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार रस्ते, पिण्याचे पाण्याचा प्रश्न यापुढे रहाणार नाही असे सांगत ते म्हणाले, आमचा नेता अजितदादा पवार आहेत. Alandi news
यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, मरकळ गट आणि आळंदी शहर या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. सर्व मित्र पक्ष महायुतीचे माध्यमातून एकत्रित प्रचार सुरु आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचने वरून मनसे ने देखील शिरूर लोकसभा मतदार संघातील आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी याठिकाणी येथे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले. बाबू वागस्कर यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केले. खेड तालुक्याचे विकासाची मुहूर्त मेढ गेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वी रोवली. Alandi
यावेळी आढळराव पाटील म्हणाले, गेले महिन्या भरापासून या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये देशाच्या विकासाचे मुद्दे आवश्यक आहे. प्रचाराचे मुद्दे सुटत चाललेले आहे. एकमेकावर वैयक्तिक टिप्पण्या अशा प्रकारचं राजकारण चालू असताना खऱ्या अर्थाने आपण आपल्या मतदार संघाचा, देशाचा विकासाचा विषय लक्षात घेऊन निर्णय आवश्यक आहे. मला वाटतं समोरच्यांनी काय टीका करावी किती टीका करावी याच्याबद्दल मी काय म्हणणार नाही. पण मी आवडतो या ठिकाणी आपल्याला हे सांगू इच्छितो मी इथं निवडणुकीमध्ये उभा आहे. मतदारसंघांत जी कामे उर्वरित आहेत. त्या कामांना पूर्ण करणं माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. समोरच्याला मीडियावर काही बोलू द्या.मी केलेल्या विकास कामावर स्टॅम्प मारून लोकां पर्यंत नेत आहे. अशा प्रकारच्या किती अफवा करू द्या. माझ्या दृष्टीने माझा सिंगल पॉईंट विषय विकास आहे. आपल्या सगळ्यांचे अपेक्षा ही होती ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्या फोन तरी घ्यावे आपल्या मतदारसंघांमध्ये गावाला आपल्या भेटीद्याव्यात. आणि आम्ही अडचणीत असून तेव्हा अशी अपेक्षा मात्र दुर्दैवाने तुमच्या सगळ्यांचा अनुभव पाहता यावेळी यापूर्वी झालेली चूक दुरुस्त होईल. संसदरत्न खासदार म्हणून विकासाचे प्रश्न सुटत नाही. कांद्याला भाव नाही. सोशल मीडियावर मुद्दे काढून खोटा अपप्रचार केला तरी लोक आता हुशार झालीत. आपण मला वीस वर्ष ओळखतात. प्रत्येक गावात खासदार निधी देऊन विकास कामे केलीत. गावभेट दौरा, साप्ताहिक जनता दरबार सुरू आहे. यामाध्यमातुन संवाद कायम ठेवला. ज्यांनी मतदान केले, त्यांचेसाठी लोकां सोबत राहिलो.
जनतेने आता सावध राहिले पाहिजे. केंद्रात मोदी सरकार पुन्हा येणार आहे. तर विरोधी खासदार गेला तर विकास कामे मागे राहतील असे सांगून लोकांची संवाद साधला.
यावेळी डॉ. विकास थोरवे, आळंदी येथील शहराध्यक्ष किरण येळवंडे, राहुल चव्हाण, अजय तापकीर, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, योगेश रंधवे यांनी संवाद बैठक मेळाव्याचे नियोजन करून यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभार माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांनी मानले. महायुती सर्व घटक पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !
भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास
रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?
व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ
ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी
नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी