Rupali Ganguly : प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली हिने ‘अनुपमा’ या टीव्ही शोमधून आपली राजकीय इनिंग सुरू केली आहे. तिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिने बुधवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचली आणि त्यांनी पक्षात प्रवेश केला.
‘अनुपमा’ आणि ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली टीव्ही स्टार रुपाली गांगुली हिने बुधवारी भारतीय राजकारणात प्रवेश केला. तिने भाजप नेते विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. रुपालीसोबत चित्रपट दिग्दर्शक अमय जोशी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमेयने अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या दोघांनी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट देखील घेतली आहे.
Rupali Ganguly
रुपाली सध्या ‘अनुपमा’ या मालिकेद्वारे टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. या शोमध्ये ती मुख्य पात्र अनुपमाची भूमिका साकारत आहे. 2020 मध्ये, कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेल्या या शोने अनेक विक्रम मोडले आणि ‘सर्वाधिक पाहिलेला’ आणि आता प्रेक्षकांचा ‘सर्वाधिक आवडलेला’ शो बनला.
रुपालीची लोकप्रियता प्रचंड आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2.9 मिलियन म्हणजेच 20 लाखांहून अधिक लोक फॉलोवर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे तिचे ‘फॅन गर्ल’ क्षण शेअर केले होते.
रुपाली ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ सारख्या हिट शोचाही भाग आहे. 2013 मध्ये ‘परवरिश’ ही मालिका केल्यानंतर तिने 7 वर्षांचा ब्रेक घेतला. यानंतर रुपाली ‘अनुपमा’सोबत टीव्हीच्या दुनियेत परतली.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक
निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न
ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल
ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी
मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ
संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स
IIIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती