Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : थेरगावात "मशाल निष्ठावंत" पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

PCMC : थेरगावात “मशाल निष्ठावंत” पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे जोरदार स्वागत – PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ थेरगावात “मशाल निष्ठावंत” पदयात्रा काढण्यात आली. थेरगावात या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून, तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. pcmc news

उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी थेरगावचे ग्रामदैवत बापूजीबुवा मंदिरात दर्शन घेतले. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रचार यात्रेला सुरुवात झाली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” या जयघोषाने थेरगावचा परिसर दणाणून गेला होता. थेरगाव परिसरातील विविध भागात प्रचार दौऱ्यात मतदारांच्या गाठी-भेटी, लग्न समारंभ, प्रचार फेरीच्या माध्यमातून वाघेरे (Sanjog Waghere Patil) यांनी मतदारांशी मनसोक्त संवाद साधला.

या वेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक संपत पवार, नंदू बारणे, शिवसेना विभाग प्रमुख गणेश पाडूळे, दत्ता केदारी, प्रमोद शिंदे पाशाभाई पठाण, खैम शेख यांच्यासह ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, संघटनेचे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. pcmc news

थेरगाव गावठाणासह पवारनगर, सोळा नंबर, संतोषनगर, गुजरनगर या भागातील व परिसरातील सोसायट्यांमध्ये “मशाल निष्ठावंत” पदयात्रा असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत काढण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी, निष्ठावंताची शिवसेना म्हणून ओळख असलेल्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल

ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय