Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याActor Govinda : अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

Actor Govinda : अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

Actor Govinda : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Actor Govinda) राजकारणात प्रवेश केल्याची मोठी बातमी आहे. अभिनेते गोविंदा यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंदाने (Actor Govinda) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. तेव्हा पासून अभिनेते गोविंदा राजकारणात येणार असल्याचे बोलले जात होते. आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गोविंदा ने प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.

उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे निवडणूकीच्या रिंगणात आहे. आता कीर्तिकरांच्या विरोधात गोविंदा लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोविंदा यांच्या पक्ष प्रवेशानंतर गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. ते म्हणाले की, “मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मला जी जबाबदारी देईल, ती योग्य रितीने पार पाडेन. त्यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला असता अजून ते काही ठरवलं नसल्याचे गोविंदा ने सांगितले.

2004 साली लढवली होती निवडणूक

गोविंदा यांनी यापुर्वी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. गोविंदा यांनी 2004 साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव गोविंदांनी केला होता. ही टर्म पुर्ण केल्यानंतर गोविंदा हे राजकारणातूनही बाहेर पडलेला होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

संबंधित लेख

लोकप्रिय