Friday, November 22, 2024
Homeराज्यऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

वाराणसी : सध्या देशभरात टोमॅटोची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. पंधरवड्यापूर्वी टोमॅटो 15 ते 20 रुपये किलोने मिळत होता, तो जुलैच्या पहिल्या दिवसापासून महाग होत आहे. मुंबईसह देशातील अनेक शहरांत टोमॅटोचे दर 150 पार गेले आहेत. टोमॅटोने पेट्रोल डिझेलचे रेकॉर्डही मोडले आहे.

टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. अशात काही व्यावसायिक आपल्या दुकानाची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे. मध्य प्रदेशच्या अशोकनगर येथील एका मोबाईल विक्रेत्याने स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुकानदार 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची अनोखी ऑफर आणली. या ऑफरची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच आता एका पठ्ठ्याने थेट टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर बाऊन्सर तैनात केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये टोमॅटो 120 ते 150 रुपये किलोने मिळतात. वाराणसीतील भाजीपाला दुकानदार अजय फौजी यांनी आपल्या दुकानासमोर दोन बाऊन्सर तैनात केले आहे. फौजी यांनी सांगितले की, टोमॅटो खूप महाग झाले आहेत. महागाईमुळे लोक 100 आणि 50 ग्रॅम टोमॅटो घेत आहेत. टोमॅटोवरून मारामारी सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी टोमॅटोची लूट होत आहे. हा वाद टाळण्यासाठी दुकानात दोन बाऊन्सर टोमॅटोच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, अनेकांनी हा दुकानदार समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. महागाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारे महागाईला विरोध करून चर्चेत यायचे आहे. आता या दुकानाची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.

हे ही वाचा :

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

संबंधित लेख

लोकप्रिय