Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याNarayan Rane: अखेर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या ‘या’ उमेदवारासोबत होणार...

Narayan Rane: अखेर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या ‘या’ उमेदवारासोबत होणार टक्कर

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा अखेर सुटला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळालेली आहे. भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छूक होते. तसेच या जागेवर शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केला होता. या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते. मात्र आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद संपला आहे. या जागेवर महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) हे निवडणुकीच्या रिंगणात असतील.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आज आणखी एक यादी जाहीर झाली आहे. या यादीत भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच नारायण राणे यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले होते. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ४ उमेदवारी अर्ज घेतले होते.

दरम्यान, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे (Narayan Rane) यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्यासोबत राहू असं स्पष्ट करत कोणताही वाद नसल्याचं त्यांनी सागितले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना


संबंधित लेख

लोकप्रिय