Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPrakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी समोर

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी समोर

Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchi Bahujan Aaghadi) आणि महाविकास आघाडीमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. अनेकदा महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची चर्चा झाली. मात्र आता या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी (Vanchi Bahujan Aaghadi) आणि महाविकास आघाडीमध्ये युतीच्या चर्चा असताना आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी मोठा धक्का दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळाच डाव खेळला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. या सोबतच नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

या सोबतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युतीचा नवा फॉर्मुला तयार केल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी घेतला. त्याला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून याबाबत अंतिम निर्णय हा येत्या 30 तारखेला होणार असल्याचे बोलले जात आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

संबंधित लेख

लोकप्रिय