Amol Kolhe : ”शिवाजीराव आढळराव पाटील हे २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांचा अजेंडा हा मतदारसंघाचा विकास नव्हे, तर केवळ ‘बदला’ घेणे एवढाच आहे,’ अशी टीका शिरूर मतदारसंघाचे महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे.
डॉ. कोल्हे यांनी शनिवारी दिवसभर वाघोलीमध्ये आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क साधला. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आमदार अशोक पवार, बाळासाहेब सातव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले की, शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे व महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी मी उभा आहे. यामुळे ही लढत ‘बदला’विरुद्ध महाराष्ट्राची अस्मिता अशी आहे.
शेतकरी व अनेक प्रश्नांवर भाजपचे सर्वच खासदार संसदेत कधीच बोलत नाहीत. त्यांनी केवळ मोदींचा जयजयकार केला. मी मात्र शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला. अनेक मोठी कामे मार्गी लावली. यापुढेही मतदारसंघात जी कामे मार्गी लावली ती प्राधान्याने पूर्ण करणे. पुणे नगर रस्ता, नाशिक रस्ता, इंद्रायणी मेडीसीटी प्रकल्प पूर्ण करून घेणे, अशा अनेक कामांना प्राधान्य देणे हा माझा प्रथम अजेंडा आहे.
हे ही वाचा :
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा
…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !
महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार
अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !
शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….