मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मंत्री मंडळ विस्तारामध्ये केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकिय वर्तूळात आहे.
राज्य सरकार तसेच केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित असून लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांपूर्वी दोन्ही स्तरांवर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यात आणि केंद्रात शिंदे गटाला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांना नारळ मिळू शकत अशी माहिती आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात निवडणुका आणि मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली असून केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, भावना गवळी यांचं नाव चर्चेत आहे. याचसोबत प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद जाणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटमुळे नेटकरी बुचकाळ्यात, सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा
ट्विटरला न्यायालयाचा मोठा दणका, या प्रकरणात ठोठावला ५० लाखांचा दंड
मोठी बातमी : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार म्हणाले, मला गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची माहिती
शेतकऱ्यांसाठी खूशखबर : शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ, वाचा काय आहे योजना
नोकरीच्या बातम्या वाचा :
ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती