Friday, November 22, 2024
Homeजिल्हाअक्षय भालेराव या दलित तरुणाच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध – गुन्हेगारांना कडक...

अक्षय भालेराव या दलित तरुणाच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध – गुन्हेगारांना कडक शासन करण्याची माकपची मागणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील अक्षय श्रावण भालेराव याची हत्या ही जातीय श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून झाली आहे. या अमानुष कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करत असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी ही मागणी असल्याचे माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर म्हणाले.

डॉ. नारकर म्हणाले, या प्रकरणी अक्षयचा भाऊ आकाश याने दाखल केलेल्या तक्रारीवरून या हत्येमागे केवळ वरिष्ठ जातीय अहंकार असल्याचे दिसून येते. मृत अक्षय आणि त्याचे कुटुंबिय दलित असून मोलमजुरी करून गुजराण करतात. या वस्तुस्थितीवरून त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचा जीव घेणे हा आपला हक्कच असल्याची अजूनही तथाकथित वरिष्ठ मालमत्ताधार जातीयांमध्ये भावना आहे. भारतीय संविधानाला हे अजिबात मान्य नाही.

या गावात आजवर डॉ. आंबेडकर जयंती साजरी होत नव्हती. या वर्षी ती प्रथमच साजरी करण्यात अक्षयने पुढाकार घेतला होता. त्या कारणाने अक्षयची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या बाबतीत तेथील पोलीस खात्याची आणि प्रशासनाची काय भूमिका होती, हेही तपासून पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भालेराव कुटुंबियांच्या अतीव दुःखात सहभागी आहे. या निर्घृण कृत्याच्या पार्श्वभूमीवर आकाश आणि भालेराव कुटुंबियांना पोलिसांनी संरक्षण पुरवले पाहिजे. या प्रसंगाच्या परिणामी या कुटुंबियांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य कमिटी भालेराव कुटुंबियांना तातडीची एक लाख रुपयांची मदत देत आहे. राज्य शासनाने भालेराव कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत तातडीने केली पाहिजे अशी मागणी माकपने केली आहे.

या गुन्हेगारी कृत्यामुळे बोंडार हवेली गावातील सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते. त्यातून आणखी अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. गावातील सर्व जातींमधील जनतेला सोबत घेत गावात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही डॉ. नारकर म्हणाले.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

संबंधित लेख

लोकप्रिय