Friday, April 26, 2024
Homeजिल्हासिटू कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात गरीब श्रमिकांसाठी 25000 घरे...

सिटू कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात गरीब श्रमिकांसाठी 25000 घरे बांधणार !

नाशिक : सीटू कामगार संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब श्रमिकांच्या घराचा प्रश्न हाती घेतला आहे. शहरातील सामाजिक बांधिलकी असलेल्या बिल्डर डेव्हलपर्सना बरोबर घेऊन सिटू गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये पंचवीस हजार घरे बांधण्याचा उपक्रम सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी जाहीर केला.

ते सातपूर मळे परिसरात कोठावळे पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, व रामभूमी इन्फ्रा प्रा.लि. बिल्डर्सच्या वतीने 160 घरांच्या प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कॉ. सिताराम ठोंबरे, संस्थेचे प्रमुख अनिल दंडगव्हाळ, संतोष कोठावळे, किरण लोणे, सागर कोठावदे, नरेंद्र सोनार, दत्तू मौले, पंडितराव विधाते कॉ. सिंधू शार्दुल, कॉ.तुकाराम सोनजे, कॉ.आत्माराम डावरे, यासह कामगार मोठ्या संख्येने सहभागी होते.

सदर उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, सीटूने कायम कामगारांचे वेतन वाढवून, त्या माध्यमातून कामगारांना सक्षम करून, त्यांचे हक्काचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. आता कामगार वर्गापैकी गरीब श्रमिक, कंत्राटी कामगार, घर कामगार, बांधकाम कामगार, टपरीधारक, रिक्षा चालक, दुकानातील कामगार अशा कामगारांसाठी परवडणाऱ्या रास्त दरात व त्यांना हक्काचे घरे मिळवून देण्याचा निर्धार सिटूने केला आहे. यासाठी राज्यातील विविध बिल्डर्स, डेव्हलपर्स, यांचेशी सिटू संघटना चर्चा करत आहे.

तसेच ही घरे मिळवून देताना शासकीय योजनांचा निधीही कामगारांना मिळवून देण्यात येत आहे. बँकांचेही सहकार्य घेतले जात आहेत व अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्यातून सीटू गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये 25,000 घरे उपलब्ध करून गरीब श्रमिकांच्या साठी बांधले जाणार आहेत. हा महत्त्वाकांक्षी निर्णय सीटूने घेतला आहे.

कामगारांच्या हक्कासाठी लढत असतानाच शहरातील आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा या चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात यासाठी ही संघर्ष करत आहे. यावेळी 18 श्रमिकांनी 11,000 रुपये भरुन घरासाठी नोंदणीही केली. सिटूच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय