Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यवारणा महाविद्यालयात निरोगी आरोग्य आणि वृध्दत्व या विषयावर व्याख्यान

वारणा महाविद्यालयात निरोगी आरोग्य आणि वृध्दत्व या विषयावर व्याख्यान

वारणानगर : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक प्रबोधिनी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी 20 परिषद, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “निरोगी आरोग्य आणि वृद्धत्व”, या विषयावरच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रमुख व्याख्याते म्हणून गॅलेक्सी हॉस्पिटल, वारणानगर चे अध्यक्ष आणि कोची (केरळ) येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मधील प्रसिद्ध जेरियाट्रिक्स (वृद्धावस्था) डॉ. विराजराव आनंद कोरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी प्राध्यापक प्रबोधिनीच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

डॉ. विराजराव कोरे म्हणाले की, “वृद्धत्व मनुष्याच्या आयुष्यातील अविभाज्य अंग असून त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे वृद्धांचे आयुष्यमान वाढत असून २०५१ पर्यंत ते ९० ते ९५ वयापर्यंत वाढणार आहे. हे जरी खरे असले तरी चाळीशी नंतरच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जसे लहान मुलांचे डॉक्टर आहेत तसे वयस्कर, वृद्ध लोकांच्यासाठी स्वतंत्र डॉक्टर आहेत याची फार कमी लोकांना कल्पना आहे. वृद्धांचे आयुष्यमान सुखकर करण्यासाठी जशा लहान मुलांना वेगवेगळ्या लसीच्या मात्रा दिल्या जातात तशा साठ वयाच्या नंतरही लोकांना वेगवेगळ्या लसीच्या मात्रा देणे आवश्यक आहे, त्यामुळे अनेक आजारांना रोखण्यास मदत होते. वृद्धांच्या साठी योग्य आहार , औषधं, व्यायाम, झोप, सामाजिक संबंध आणि मैत्रीपूर्ण वातावरणाची गरज आहे. मन, मेंदू, हृदयावरील ताण आणि शरीराचे स्नायू कमजोर होऊ नयेत यासाठीची काळजी म्हणून सकस आहार ,शारीरिक हालचाली, भरपूर पाणी पिणे आणि सातत्याने आरोग्याची काळजी घेणे हाच त्यावरील उपाय आहे. आवश्यक तेथे वेगवेगळ्या आजारावरती अनेक गोळ्या घ्याव्या लागतात त्या जरूर घ्याव्यात परंतु सातत्याने गोळ्यांची संख्या वाढत जाऊन दहा-बारापेक्षा जादा होतात. अशा वेळी औषधाच्या चार पेक्षा अधिक गोळ्या शरीरासाठी हानिकारक असून औषधांचे नियोजन असणे आवश्यक आहे त्याच्यावर नियोजनबद्ध योग्य, सकस आहारच गोळ्या औषधाचे काम करीत असतात, गोळ्या औषधे कमी करावयाच्या असतील तर योग्य पद्धतीच्या आहारातून कमी करणे शक्य आहे”, असेही ते म्हणाले.

डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यावेळी म्हणाले की,”प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून एका अनोख्या विषयावरती जागृती करणे हा उद्देश असून प्रत्येक घरात आई-वडील, आजोबा-आजी, वयस्कर नातेवाईक आणि सेवानिवृत्तीनंतर प्राध्यापक- कर्मचारी यांना वेगवेगळ्या मार्गाने वृद्धत्वाला सामोरे जावे लागते. वृद्धत्वातील समस्या निर्माण होण्याच्या अगोदरच आपण सक्रिय होऊन काळजी घेतली तर वृद्धत्व आनंददायी होऊ शकते. वृद्ध हे कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. ती परिवारातील अडगळ नाही, त्यांनी अपार कष्टाकरुन घरासाठी, घरातील लोकांच्यासाठी शारीरिक, मानसिक झीज सोसलेली असते. त्यांनी आयुष्यभर परिवारासाठी त्या केलेला असतो म्हणून प्रत्येक घराघरात वृद्धांच्या संगोपनाची जबाबदारी प्रामाणिकपणे घेतली जावी. वृद्धांच्या साठी व्यायाम शाळा, हास्य क्लब, सोयीच्या ठिकाणी औषधोपचार, आणि सामाजिक कार्यात वृद्धांचा सक्रिय सहभाग या माध्यमातून वृद्धांचे जीवन आनंददायी येऊ शकते”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रारंभी डॉ‌. बी. के. वानोळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. दरम्यान व्याख्यानानंतर वृद्धांच्या समस्या वरती चर्चासत्र संपन्न झाले. त्याच्यात प्रा. एम. जी. चिखलकर, डॉ. आर. बी. पाटील, डॉ. प्रभा साळोखे, डॉ.एस. एस. जाधव, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, तानाजी शिंदे यांनी सहभाग नोंदविला. डॉ. सी. आर. जाधव यांनी उपस्थित आमचे आभार मानले.

हे ही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन बंपर भरती; आजच करा अर्ज

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय