Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याRajat Sharma : चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

Rajat Sharma : चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

Rajat Sharma : काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या रागिणी नायक यांना इंडिया टिव्हीचे पत्रकार रजत शर्मा यांच्याकडून एका लाईव्ह कार्यक्रमात शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान, एका चर्चेच्या विषयावर मतभेद झाले, त्यावेळी रजत शर्मा यांनी लाइव्ह डिबेटमध्ये रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. 

इंडिया टिव्ही या वाहिनीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा सुरू होती. या चर्चेसाठी काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या रागिणी नायक यांना डिबेटमध्ये बोलवण्यात आले होते. परंतु चर्चेदरम्यानच रजत शर्मा यांनी रागिणी नायक यांच्यासोबत गैरवर्तणूक केली. या चर्चेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेन्ड होत असून रजत शर्मा यांना ट्रोल केले जात आहे.

काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या रागिणी नायक यांनी सोशल मीडिया एक्स वर लिहले आहे की, पहिला व्हिडिओ मी ट्वीटरवर (आताचे एक्सवर) पाहिला. या व्हिडिओ मध्ये रजत शर्मा हे शिवीगाळ करताना दिसत आहे. मी व्हिडिओबाबत तथ्य तपासले, या व्हिडिओचे कच्चे फुटेज चॅनलवरून काढले गेले. पत्रकारितेची घसलेली पातळी यापेक्षा काय असू शकते. असे रागिणी नायक यांनी म्हटले आहे. तसेच रजत शर्मा यांच्याकडे काही उत्तर आहे का? असा प्रश्न शर्मा यांना विचारला आहे. 

यामध्ये त्यांनी त्या लाईव्ह डिबेटचा व्हिडिओ ही जोडला आहे. या व्हिडिओमध्ये, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप किती जागा जिंकेल याबाबत दोघेजण चर्चा करताना दिसत आहेत. परंतु, मध्येच रजत शर्मा यांनी शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत कैद झाले आहे.

Rajat Sharma यांनी फेटाळले आरोप

दरम्यान, इंडिया टिव्हीच्या लीगल हेड रितिका तलवार यांनी रागिणी नायक यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इंडिया टिव्हीने म्हटले आहे की, रागिणी नायक यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि त्यात कोणताही आधार आणि पाया नाही. ते दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक आहेत. असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ह्या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनेक महिला संघटना आणि नेते यांनी ह्या घटनेचा निषेध केला आहे आणि त्यांनी रजत शर्मा यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

संबंधित लेख

लोकप्रिय