Friday, April 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशिधावस्तू या दिवाळीला मिळतील का ? रेशनकार्ड धारकांची दुकानदाराकडे वारंवार विचारणा

शिधावस्तू या दिवाळीला मिळतील का ? रेशनकार्ड धारकांची दुकानदाराकडे वारंवार विचारणा

पिंपरी चिंचवड (क्रांतिकुमार कडुलकर) : गरिबांना व सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीसाठी यंदा शिंदे सरकारने स्वस्त धान्य दुकानात १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी १ किलो व १ लिटर पाम तेलाचा संच या चार वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिक रेशनकार्डधारक शिधावाटप दुकानात हे कधी मिळणार म्हणून चकरा मारत असून अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी आली आहे अजून एकही वस्तू आली नाही, खरोखर या दिवाळीलाच हे धान्य हा संच मिळणार की केवळ घोषणाच ठरणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला केवळ घोषणा न ठरता त्यांना द्या, त्यांची निराशा करू नका अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे की, केवळ घोषणा केली जाते शासकीय आदेश निघाल्यानंतरही प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी बराच कालावधी जाऊ शकतो आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला नाही पाहिजे. दिवाळी २ दिवसांवर आली असताना अद्याप नागरिकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही केलेली आहे. दिवाळी तोंडावर आल्याने ह्या वस्तू मिळणार कधी व फराळ बनवणार कधी ? अशा प्रकारची समस्या असा प्रश्न सर्वसामान्य कार्डधारकांना पडलेला आहे. सरकारने तातडीने हे वितरण करावे अन्यथा बोलाची कडी बोलाचा भात होणार आहे अशी टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय