Saturday, January 28, 2023
Homeराजकारणब्रेकिंग : खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. त्यामुळे राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप आहे. राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्यासोबतच त्यांच्या वडिलांवर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं 8 जून 2021 रोजी रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय