Monday, March 17, 2025

ब्रेकिंग : महाविकास आघाडीला शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा धक्का, बदलला ‘हा’ निर्णय

मुंबई : महाविकास आघाडीला शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्ते असताना घेतले गेलेले अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलले असताना आता आणखी एक महत्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे.

सीबीआयला महाराष्ट्रात तपास करायचा असेल, तर आधी त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत होती, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे. यापुढे सीबीआयला महाराष्ट्रात तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे राज्यात सीबीआय तपासाला आता अधिक वेग येणार असल्याचं बोललं जातंय. सीबीआय तपासासाठी आता राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक नसणार आहे. त्यामुळे सीबीआय तपासातील तांत्रिक अडथळे दूर होतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सीबीआय तपासाला राज्य सरकारच्या परवानगीची करावी लागणारी प्रतिक्षा आता संपुष्टात आलीय.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles